रंग
नितळ निळाई आभाळाची.
सागर हि निळे निळे
कवेत घ्यावे अवघे विश्व
विशाल बना हे मना कळे
हिरव्या हिरव्या विविध छटा
लेवून नटली अवघी सृष्टी
चराचरामध्ये निसर्ग देवता
पडते आपल्या नेहमी दृष्टी
लाल गुलाबी फुले टपोरी
बघता मन हे हरखून जाई
असो वेगळी प्रत्येक व्यक्ती
लाल रक्त हे नसात वाही
हळद पिवळी सोने पिवळे
मखमली हे ऊन हि पिवळे
क्षणात निघत सूर्यबिंब हि
सारा आसमंत उजळे
भगवा रंग वैराग्याचा
साधू बैरागी अन साध्वीचा
तप साधना सन्मार्गाचा
दीप उजळे आत्मतेजाचा
रंग जांभळा रानमेव्याचा
जांभूळ पिकल्या करवंदाचा
दऱ्यादऱ्यातुन शीळ घालुनी
मजा घेऊया प्रतिध्वनीचा
रंग पांढरा पावित्र्याचा अन
मनातील शांततेचा
विसर पडून मी पणाचा
अवघे रंग एक होण्याचा
इंद्रधनू हि प्रगटे नभी
सप्तरंगांची होता उधळण
रंगून रंगात साऱ्या
रंगून जावे अवघे जीवन
By Revati Shashikant...
Khup Chan rang
ReplyDeleteKhup sundar.!👌👍
ReplyDeleteअप्रतिम चैतन्य
ReplyDelete