आई

आई असते प्रेमाचा वात्सल्याचा धागा
बांधून ठेवते एकत्र कुटुंबाचा गाभा

तिचं प्रेम तिची माया कधीच आटत नाही
सदैव ती आपल्या पाखरांची वाट पाही

लहान असताना भरवते काऊचिऊचा घास
तेंव्हा तिच्यात असतो साक्षात अन्नपूर्णेचा वास

तिच्या हातचा खाऊ तिच्या हातचे जेवण
तृप्त तृप्त होऊन जातं शरीर अन मन

चूक होताच कधीतरी धपाटा हि घालते
नंतर मात्र लगेच कवेत आपल्या घेते

आपण मोठं मोठं व्हावं असाच तिला वाटतं
ह्याच आशेपोटी मन अहोरात्र झटतं

यश मिळताच कौतुकाची पाठीवर देई थाप
संकट समयी आधार देई पाठीवर फिरवून हात

तिचं जग तिचं विश्व् आपल्याभोवती फिरतं
कितीही तिनं दिलं तरी मन होत नाही रितं

हळूहळू काळ जातो मोठे होतो आपण
तेंव्हा येत असतं आईलाही म्हातारपण

सुरकुतलेली तिची काया बघून डोळ्या पाणी येई
तेंव्हा आपणच बनायचे असते आईची आई
         सौ रेवती शशिकांत

Comments

  1. Casino Games Near Me | MapyRO
    A 전주 출장안마 casino is 경산 출장샵 a type of gambling establishment 원주 출장마사지 that has no 과천 출장샵 gambling license. The casino is one of the most recognizable, colorful, and 김해 출장마사지 popular online gambling companies in

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पावसाळा